लाच घेताना पालघरचे अतिरिक्त आयुक्त तसेच उपायुक्त जेरबंद

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका आयएएस अधिकारी आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या आदिवासी खात्याच्या उपआयुक्तांना 12 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिलिंद गवादे (54) हे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत. तर किरण माळी(39) हे आदिवासी विभागाचे उपआयुक्त आहेत.

काही वर्षांपूर्वी आश्रम शाळेत सुप्रिटेंडेंटच्या पदावर काम करणाऱ्या एकूण 12 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन रेक्टर करण्यात आले होते. या पदावर कायम राहण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी या 12 कर्मचाऱ्याकडून प्रत्येकी एक लाख रूपयांची मागणी केली होती. अन्यथा शिक्षणाच्या धर्तीवर सगळ्यांना पुन्हा सुप्रिटेंडेंट केलं जाईल अशी धमकीच अतिरिक्त आयुक्तांनी दिली होती. 

प्रकरणी कर्मचऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. शनिवारी एसीबीने सापळा लावला आणि 12 लाखांची लाच घेताना उपआयुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहात अटक केली.

पुढील बातमी
इतर बातम्या