अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालणार

मुंबई - कॉन्स्टेबल विलास शिंदे मृत्यू प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालणार असल्याचं स्पष्ट झालंय. विलास शिंदे मृत्यू प्रकरणात एका आरोपीचं वय 17 वर्ष आहे. त्यामुळे ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.

कायद्यानुसार जर आरोपीचं वय 16 किंवा 17 असेल आणि त्याच्याकडून झालेल्या अपराधाची शिक्षा सात वर्षे असेल तर अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालेल. 31 ऑगस्ट 2016 ला विलास शिंदे यांचं उपचारादरम्यान लिलावती रुग्णालयात निधन झालं.

पुढील बातमी
इतर बातम्या