राज्यभरातील सरकारी रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्यात आली. शिवाय पालिकेने आत्तापर्यंत खाजगी सुरक्षेवर सुमारे १०० कोटी खर्चही केले. येत्या वर्षभरासाठी ११ कोटी खर्चही प्रस्तावित केला आहे. असं असलं तरीही अद्याप डॉक्टरांवरचे हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. रविवारी रात्री केईएमच्या डॉक्टरांवर एका रुग्णाने चक्क सर्जिकल ब्लेडने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात डॉक्टर तरुण शेट्टी (26) जखमी झाले असून, या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सुनील बामळे (22) नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
या प्रकरणी आम्ही आरोपी सुनील बामळे याला भादंवि कलम 324, 332 , 504 कलमांतर्गत अटक केल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली आहे.