पवई किडनी रॅकेटप्रकरणी आरोपपत्र दाखल

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पवई पोलिसांनी अंधेरी न्यायालयात १ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये दोन डाॅक्टरांसह चार जणांना पोलिसांनी फरार घोषित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतर दोन्ही डाक्टरांबाबत निर्णय घेण्यात येणार असून, रॅकेटमधील ब्रिजकिशोर जैस्वाल याचा मृत्यू झाल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात सुरू असलेल्या किडनी रॅकेटचा जुलै महिन्यात पर्दाफाश झाला होता. त्यानंतर पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी भजेंद्र हिरालाल भिसेन, ब्रिजकिशोर जैस्वाल, त्याचा पुत्र किशन जैस्वाल, इक्बाल सिद्दीकी, भारतभूषण शर्मा, निलेश कांबळे, ख्वाजा पटेल, युसूफना दिवाण, शोभना दिनेशभाई ठाकूर उर्फ शोभादेवी, रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजित चटर्जी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. मुकेश शहा, डॉ. प्रकाशचंद्र शेट्टी, डॉ. कर्नल अनुराग नाईक यांना अटक केली होती. या प्रकरणातील तक्रारदार यांच्यासह रुग्णालातील कर्मचारी अशा एकूण ३० जणांचे जबाब नोंदविले आहेत.

 

पुढील बातमी
इतर बातम्या