लाखोंच्या मुद्देमालासह दुचाकी पळवली

मानखुर्द - घरातील सर्वजण गाढ झोपेत असताना घरफोडी करुन लाखोंचा माल लंपास केल्यानंतर चोरट्यांनी घराबाहेर उभी असलेली दुचाकी देखील लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे मानखुर्दच्या मंडाळा परिसरात घडली आहे.

याठिकाणी राहणारे राहुल तिवारी यांच्या घरी ही घरफोडी झाली असून आरोपींनी घरातील सहा मोबाईल फोन, पाच हजार रुपये रोख आणि इतर सामान असा मुद्देमाल घेउन पळ काढला. जाताना त्यांना एका दुचाकीची चावी देखील दिसली. त्यामुळे एकाने ती चावी घेऊन गल्लीबाहेर उभी असलेली दुचाकी देखील घेऊन पळ काढला. याबाबत मानखुर्द पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या