मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीने वार

भररस्त्यात एका वकिलावर तलवारीनं जीवघेणा हल्ला केल्याची घटना मुंबईतील बोरिवलीमध्ये घडली आहे. या घटनेचा सर्व थरार परिसरातील एका नागरिकानं आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांंनी तीन आरोपींना अटक केली आहे. 

सत्यदेव जोशी असं गंभीर जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे. बोरीवलीच्या एमएचबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जुलै रोजी ही घटना घडली होती.  हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. 

व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 307, 326, 324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या