ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - ऑनलाइन पद्धतीनं आवेष्टीत वस्तूंची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मेसर्स इन्स्टाकार्ट आणि मेसर्स अॅमेझॉन या ऑनलाइन कंपन्यांवर वैद्यमापन शास्त्र विभागानं कारवाईचा बडगा उगारला आहे. इन्स्टाकार्ट यांच्या सर्व्हिस प्रोव्हायडर आणि अॅमेझॉन यांच्या भिवंडी येथील जागेला भेट देऊन पाहणी केली. त्यात इन्स्टाकार्टकडं 37 लाखांच्या 18 प्रकारच्या आवेष्टत वस्तू आणि अॅमेझॉनकडील विविध प्रकारच्या 47. 7 लाखांच्या 21 आवेष्टीत वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तूंवर वैधमापन शास्त्र (आवेष्टीत वस्तू) नियम 2011 मधील तरतूदीनुसार, उत्पादक, आयातदार, आवेष्टक यांचे नाव आणि पत्ता, वस्तूंची किंमत, वस्तूचे नाव, आयात महिना आणि वर्ष, कस्टमर केअर नंबर इमेल आयडी या उद्घोषणा नसल्यामुळं जप्त करण्यात आल्या आहेत. आवेष्टीत वस्तूंची ऑनलाईन खरेदी करताना आवश्यक उद्घोषणा असल्याची खात्री करावी, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही असं आवाहन ग्राहकांना वैद्यमापन नियंत्रक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या