महादेव बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकरला दुबईतून अटक

महादेव (mahadev) बेटिंग (batting) ॲपचा (app) मालक सौरभ चंद्राकर (saurabh chandrakar) याला दुबईत (dubai) अटक (arrest) करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईडीने (ED) परराष्ट्र मंत्रालय आणि गृह विभागाच्या मदतीने चंद्राकरला दुबईतून अटक केली आहे. सहा हजार कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे.

सौरभ चंद्राकर हा महादेव ॲपचा मालक असून तो दुबईहून महादेव बुक बेटिंग ॲप चालवत होता.

छत्तीसगडमधील भिलाई येथे राहणारा सौरभ चंद्राकर फळांचा रस विकायचा.

कोरोनाच्या काळात टाळेबंदीच्या वेळी तो बेटिंगशी संबंधित लोकांच्या संपर्कात आला होता. त्याने सट्टा सुरू केला. त्यानंतर तो ऑनलाइन सट्टेबाजीच्या व्यवसायात उतरला. त्याने हैदराबादला जाऊन ऑनलाइन बेटिंगचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातूनच बेटिंग ॲप तयार केले. त्यामुळे सध्या महादेव बुक ॲप प्रकरण देशात चांगलेच गाजत आहे.

यामध्ये काही राजकारणी, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे. या ॲपची उलाढाल सुमारे 5000 कोटी असल्याचा संशय आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना बेकायदेशीर सट्टेबाजी करणाऱ्या साइट्सचा पुरवठा केला जात होता.

यासोबतच या ॲपच्या मदतीने युजर आयडी तयार करून त्याद्वारे सट्टेबाजी केली जात होती. हे प्रकरण झारखंड राज्यापुरते मर्यादित होते.

परंतु चंद्राकरचे फेब्रुवारी 2023 मध्ये युएईमध्ये लग्न झाले आणि त्याने लग्न समारंभासाठी सुमारे 200 कोटी रुपये रोख खर्च केले.

कुटुंबीयांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खासगी विमान भाड्याने घेण्यात आले. तसेच लग्नात हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार (actors) आणि गायकांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

मुंबईतून (mumbai) वेडिंग प्लॅनर, डान्सर्स (dancers), डेकोरेटर यांनाही बोलावण्यात आले होते.

तसेच अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओन, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, भारती सिंग (bharti singh), नुसरत भरुचा, आतिफ अस्लम, अभिनेते पुलकित, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, एली अवराम हे देखील उपस्थित होते.

ईडीच्या तपासात हे सर्व व्यवहार हवालाद्वारे झाल्याचे समोर आले आहे. तांत्रिक पुराव्यांनुसार, योगेश पोपट यांच्या M/s R-1 Events Pvt Ltd च्या नावाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 112 कोटी रुपये हवालाद्वारे दिले गेले आणि हॉटेल नोंदणीसाठी 42 कोटी खर्च केले गेले.


हेही वाचा

मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला खडे बोल

दसरा मेळाव्यानिमित्त दादरमध्ये 'हे' मार्ग बंद

पुढील बातमी
इतर बातम्या