कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या मालकानं मराठीत बोलण्यास नकार दिल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी रात्रभर दुकानासमोर ठिय्या मांडला होता. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला.
अखेर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांची माफी मागितली. मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईत झाला आहे, मला माफ करा, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.
शोभा देशपांडे गुरूवारी दुपारी कुलाब्यातील ससून डॉक परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्समध्ये गेल्या होत्या. दुकानातील व्यक्ती त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत होते. मात्र त्यांनी मराठीत बोलावे अशी त्यांना विनंती केली. मात्र त्यांनी मराठीत बोलण्यास नकार तर दिलाच मात्र देशपांडे यांना दागिने देण्यासही नकार दिला. तसंच पोलिसांच्या मदतीने त्यांना दुकानाच्या बाहेर ढकलून दिलं. दुकानाचा परवाना मागितल्यावर ज्वेलर्सच्या मालकानं अरेरावीची भाषा करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचं, शोभा देशपांडे यांनी म्हटलं आहे. दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरुन देशपांडे गुरूवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या. पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वतः जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.शुक्रवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व मनसे कार्यकर्ते ज्वेलर्सच्या मालकाला आंदोलनस्थळी घेऊन आले. त्यानंतर दुकानदारानं शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मात्र, दुकानदारानं माफी मागितल्यानंतरही शोभा देशपाडे दुकानाचा परवाना दाखवावा या मागणीवर ठाम होत्या. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत घालून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांचे वय ७५ पेक्षा जास्त असून त्या अन्नपाण्याविना एकाच जागी जवळपास बारा तासाहून अधिक काळ बसून होत्या.
आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी
रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त