विवाहितेचा विनयभंग करणारा रोडरोमियो जेरबंद

रस्त्यात महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्या एका रोडरोमियोला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. निखिल विजय भैये असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकार

पुण्याच्या आंबेगावचा कोशिंबचा रहिवासी असलेला निखिल हा जोगेश्वरी पूर्व येथील बीएमसी कॉलनी परिसरात नातेवाईंकाकडे रहतो. पी़डित महिलाही याच परिसरातील राहणारी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निखिलची त्या विवाहितेवर वाईट नजर होती. 

मंगळवारी सायंकाळी पीडित महिला तिच्या मुलांना ट्युशनमधून आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी निखिलने महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. त्याकडे विवाहितेने दुर्लक्ष केलं. मात्र ऐवढ्यावरच न थांबता निखिलने विवाहितचा पाठलाग करत तिचा हात पकडून छेड काढण्याचा प्रयत्न केला.

निखिलची रवानगी पोलिस कोठडीत

पीडितेने निखिलला हटकत घरी येऊन घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर पीडितेचा पती जाब विचारण्यासाठी निखिलकडे गेला असता निखिलने उडवा उडवीची उत्तरं देत त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या पतीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी निखिलला अटक करत त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या