धक्कादायक ! नवऱ्याने पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलले

मुंबईतील गोवंडी परिसरात एका विवाहितेला तिच्याच नवऱ्याने धावत्या लोकलमधून ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिलेचा जागीत मृयू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिस अधिक तपास करत आहेत. ही सर्व घटना एका सहप्रवाशी महिलेनं पाहिल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

हेही वाचाः- नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक

अन्वर अली शेख असं या आरोपी पतीचं नाव आहे. एका महिन्यापूर्वी त्याचं लग्न पूनम चव्हाण या महिलेशी झालं होतं. पूनमचं हे दुसरं लग्न होतं. पूनमला तिच्या पहिल्या लग्नापासून तीन वर्षांची मुलगी देखील आहे. पूनमने दुसरं लग्न केल्यानंतर ती अन्वर शेखसोबत मानखुर्द येथील एका चाळीत राहत होती. सोमवारी तीनच्या सुमारास पूनम आणि अन्वर लोकलने प्रवास करत होते. यावेळी आरोपीनं आपल्या पत्नीला लोकलमधून ढकलून दिलं आहे. यावेळी या जोडप्यासोबत प्रवास करणाऱ्या संगीता नावाच्या महिलेनं हा प्रकार पाहिला. त्यानंतर संगीता यांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठून संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घडलेल्या प्रकारानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. आरोपीनं ही हत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबईत सर्व बोर्डाच्या परीक्षा घेण्यास मंजुरी

'ते दोघं पतीपत्नी लोकलने एकत्रित प्रवास करत होते. पत्नी दरवाज्याजवळच्या खांबाला लटकत प्रवास होती. काही वेळाने तिचा पती तिच्याजवळ आला आणि त्यानं तिला पाठीमागून मिठी मारल्यासारखं पकडलं. त्यामुळे आरोपी पतीच्या भरोशावर ती ट्रेनच्या बाहेर झुकली होती. पण नराधमाने अचानक मिठी सोडली. त्यामुळे ती महिला थेट ट्रेनमधून खाली पडली. ट्रेनही थोडी वेगात असल्यानं या महिलेचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.'

पुढील बातमी
इतर बातम्या