मरीन ड्राइव्ह येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) मध्ये मराठा आरक्षण आंदोलकांच्या एका गटाने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फक्त आरोपच नाही तर याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षकाला धमकावल्याचाही आरोप केला आहे.
मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ८-१० अज्ञात निदर्शकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
शंकर नामदेव साळुंखे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना दिनशा वाच्छा रोडवरील गेट क्रमांक 9 वर घडली. गेट बंद असले तरी, आंदोलकांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. साळुंखे यांनी दावा केला की निदर्शकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या, "गेट उघडे ठेवा नाहीतर आम्ही रात्री अधिक लोकांसह परत येऊ, मग काय होते ते तुम्हाला दिसेल."
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 189(1), 189(2), 189(3), 351(2), 223 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, शहरात मराठा आंदोलनाशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. कालच्या आंदोलनादरम्यान झोन 1 पोलिसांनी आठ एफआयआर नोंदवले आहेत - ज्यामध्ये मरीन ड्राइव्ह येथे दोन, आझाद मैदान येथे तीन आणि एमआरए मार्ग, जेजे मार्ग, डोंगरी आणि कुलाबा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक एफआयआर समाविष्ट आहे. सीसीआय घटनेचा आणि इतर संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे.
हेही वाचा