अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन

उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकात प्रफुल्लचा मृतदेह आढळून आला. प्रफुल्लने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. प्रफुल्लच्या अकाली जाण्याने त्याच्यासोबतच्या कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

या भूमिका गाजल्या

झी मराठी वरील कुंकू या मालिकेतून प्रफुल्ल घराघरांत पोहोचला. त्याने कुंकू या मालिकेत जनकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. प्रफुल्लने साकारलेला गण्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बारायण' या चित्रपटात देखील त्याने भूमिका साकारली होती. त्याचसोबत तू माझा सांगाती, नकुशी, ज्योतिबा फुले, या मालिकांमधून प्रफुल्लने अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

सोमवारी सकाळी मालाड स्थानकात प्रफुल्लचा मृतदेह रेल्वे पोलिसांना आढळला. प्रफुल्लचं रेल्वे अपघातात निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या