चिराबाझारमध्ये अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

चिराबाझार - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिराबाझार इथे अनिधकृत बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. यावेळी येथील काही बांधकाम साहित्य महापालिकेने जप्त केले. त्याचवेळी या बांधकामासंबंधी कागदपत्रे सादर करण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे.

मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि सहाय्यक आयुक्त राम चव्हाण यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित नगरसेविका रिटा मकवाना आणि आकाश पुरोहीत यांनी मध्यस्थी करत फक्त येथील बांधकाम साहित्यच जप्त करा, अशी विनंती केली. या भागात साई श्रद्धा इमारतीचे प्रवेशद्वार असल्याने ये-जा करताना त्रास होत असल्याने इथल्या राहीवाशांनी याबाबत तक्रार केली असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता के एस म्हात्रे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या