मुंबईत 'ह्या' १८ इमारती अतिधोकादायक

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने मुंबईतील  जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींचे सर्वेक्षण केलं आहे. त्यानुसार, म्हाडाने मुंबईतील १८ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. 

गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या सात होती. यंदा ती वाढून १८ झाली आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्यापूर्वी  सर्वेक्षण केले., मुंबईत जवळपास १६ हजार उपकरप्राप्त इमारती असून त्यापैकी ९० टक्के इमारती धोकादायक आहेत. म्हाडाच्या सर्वेक्षणानुसार अतिधोकादायक इमारतींमध्ये  ५४० रहिवासी आहेत. यामधील १२१ निवासी रहिवाशांनी त्यांची स्वतःची पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत २० रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केलं आहे. ३५४ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे.

ह्या आहेत अतिधोकादायक इमारती

  • इमारत क्र. १४४, एमजीरोड,अ- ११६३ 
  • इमारत क्र. ५०-५८, एम सारंग स्ट्रीट/ओल्ड नागपाडा क्रॉस लेन,
  • इमारत क्र. १०१-१११, बारा इमारत रोड
  • इमारत क्र. ७४ निजाम स्ट्रीट
  • इमारत क्र. १२३, किका स्ट्रीट
  • इमारत क्र. २४२-२४४, बारा इमाम रोड,
  • इमारत क्र. १६६ डी, मुंबादेवी रोड,
  • इमारत क्र. २३७, संत सेना महाराज मार्ग
  • इमारत क्र. २३९, संत सेना महाराज मार्ग
  • इमारत क्र. १४ भंडारी स्ट्रीट
  • इमारत क्र. १२ (२) नानुभाई बेहरमजी रोड
  • इमारत क्र. ३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी. रोड 
  • इमारत क्र. ३९१ डी, बदाम वाडी व्ही.पी. रोड 
  • इमारत क्र. ४४३ वांदेकर मॅन्शन, डी ४३१, डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगाव 
  • इमारत क्र. २७३-२८१, फॉकलँड रोड (डी- २२९९-२३०१),
  • इमारत क्र. १, खेतवाडी, १२ वी गल्ली (डी २०४९) ,
  • इमारत क्र. १०० डी, न्यू स्टार मॅन्शन, शाहीर अमर शेख, जेकब सर्कल, ग दक्षिण- ४८(२२),
  • इमारत क्र. ४४, मोरलँड रोड, सिराज मंझिल.

हेही वाचा -

मुंबईत ७९८ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे कंटेन्मेंट झोनची यादी

'असे' आहेत मिरा-भाईंदरमध्ये कंटेन्मेंट झोन'


पुढील बातमी
इतर बातम्या