NCB ड्रग्ज प्रकरण: या राजकिय नेत्याच्या जावयाची चौकशी सुरू


ड्रग्ज पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'चे मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर NCB  च्या चौकशीत आता मोठं नाव समोर येतं आहे. राज्यातील एका राजकिय नेत्याच्या जावयाचे नाव समोर आले आहे. या नेत्याच्या जावयाला NCB ने चौकशीला बोलवलं होतं. त्यानुसार बुधवारी तो १० वा. चौकशीसाठी हजर राहिला.

 करण संजनानीच्या चौकशीत समीर खान याचे नाव समोर आले होते. करण संजनानी आणि समीर यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना मंगळवारी चौकशीसाठी समन्स बजवण्यात आलं होतं. त्यानुसार बुधवारी समीर हा NCB  कार्यालयात चौकशीला हजर राहिला होता. एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजनानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी यांच्याशी समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?,' याची माहिती एनसीबीकडून घेतली जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या