मानखुर्दमध्ये शॉक लागून मुलाचा मृत्यू

मानखुर्द - घराबाहेर खेळत असताना तारेचा शॉक लागून एका 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मानखुर्द परिसरातील इंदिरानगर येथे घडली. मोहम्मद दस्तगीर शफीक असे या मुलाचे नाव आहे. घटनेनंतर या चिमुरड्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. मानखुर्द पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या