धारावीत अल्पवयीन मुलाचे अपहरण

धारावी - घराबाहेर खेळत असलेल्या एका ५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी धारावी परिसरात घडली. जेहसान फिरोज खान असं या मुलाचं नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी घराबाहेत खेळत असताना अचानक तो गायब झाला. त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला. मात्र तो न सापडल्यानं त्यांनी शाहुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरु केलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या