नेहरूनगर - मुंबईच्या नेहरूनगर परिसरात रिकाम्या सिलिंडरची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या टेम्पोचे कुलूप तोडून अकरा सिलिंडर चोरण्यात आले आहेत.
गुरुवारी नेहमीप्रमाणे टेम्पो चालक गोपीलाल याने आपला टेम्पो दुकानाबाहेर पार्क केला. मात्र जेव्हा तो परतला तेव्हा टेम्पोतून तब्बल 11 सिलिंडर चोरीस गेल्याचे त्याच्या नजरेस पडले. यातील 9 सिलिंडर हे घरगुती वापराचे आहेत. तर दोन सिलिंडर हे कमर्शियल वापराचे आहेत. या सिलिंडरची किंमत ही 22 हजार रुपयांच्या घरात असून, गर्दुल्याचं हे काम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.