मनसेच्या शाखा प्रमुखास खंडणीच्या गुन्ह्यात अटक

¯मुंबईच्या चारकोप परिसरात एका टेलरकडे लाखोरुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मनसेच्या शाखाअध्यक्षासह, एका समाजसेवकाला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवत टेलरकडून पैसे उकळण्याचा दोघे ही प्रयत्न करत असल्याचा आरोप दोघांवर करण्यात आला आहे.

चारकोपच्या न्यू लिंक रोडवरील ओमसाई गृहनिर्माण संस्था येथे तक्रारदार रामकृष्ण राम यांचे कपड्याचे दुकान आहे. राम हे लेडिज टेलर असून महिसांचे कपडे शिवतात. मागील अनेक दिवसांपासून चारकोपच्या मनसे पक्षाचा शाखाअध्यक्ष राजेंद्र सावंत (41), आणि केवीन डिलीमा (38) राम यांना पैशांसाठी ञास देत होते. राम यांच्यावर दबाव टाकण्यासाठी दोघांनी त्यांना विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची खोटी भिती ही दाखवली.

त्यावेळी घाबरलेल्या राम यांच्याजवळ दोघांनी 5 लाखाची मागणी केली. तडजोडी अंती टप्या टप्याने पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार राम यांनी 1 लाख 30 हजार आतापर्यंत दिले. माञ पुढची रक्कम देणे त्याला शक्य नव्हते. माञ दोघांकडून पैशांसाठी दबाव वाढत होता. रोजच्या ञासाला कंटाळून अखेर राम  यांनी चारकोपर पोलिसात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोघांना ही अटक केली आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या