'नवऱ्याने धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केली', मॅाडेलचा आरोप

"अगर तुम इस्लाम धर्म नही अपनाअोगी तो एैसा ही होगा, तुम मेरी बिबी नही बन सकती और मै तुम्हे यहां से निकाल दुंगा और ये बच्चा भी तुमसे छिन लुंगा''. हे कोणत्या सिनेमातलं डायलॉग नाही. तर ही धमकी नवऱ्याने आपल्या बायकोला दिली आहे.

मुंबईच्या वांद्रे परिसरात रहाणाऱ्या एका मॉडेलने आपल्या नवऱ्याने धर्म परिवर्तनासाठी आपल्यावर जबरदस्ती केल्याचा धक्कादाय आरोप केला आहे. याप्रकरणी मॅाडेलचा नवरा आसिफ शाबाझकर आणि त्याच्या मित्राविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्म परिवर्तन न केल्यानं मोडलं लग्न

मॅाडेल रश्मी हीने ऑगस्ट २००५ मध्ये अासिफशी प्रेमविवाह केला होता. रश्मी हिंदू आहे तर आसिफ मुस्लिम. या दोघांना एक मुलगा देखील आहे. एवढी वर्ष एकत्र संसार केल्यानंतर अलिकडे दोघांच्या नात्यात कटुता येऊ लागली होती. अखेर आसिफने 14 अॅाक्टोबर 2017 रोजी दुसरं लग्न केलं. मी हिंदू असल्यानं माझ्यावर धर्म परिवर्तनासाठी आसिफ जबरदस्ती करत होता, असं रश्मीचं म्हणणं आहे.

मित्रानेही केली शिवीगाळ

शुक्रवारी संध्याकाळी आसिफचा मित्र मुनिब घरी आल्यानंतर अचानक आसिफचा सूर बदलला. त्याने आपल्या पत्नीला चक्क घरातून निघून जाण्यास सांगितलं. तेव्हा रश्मीने त्याला का म्हणून विचारले असता "अगर तुम ईस्लाम धर्म नही अपनाअोगी तो एैसा ही होगा, तुम मेरी बिबी नही बन सकती और मै तुम्हे यहां से निकाल दुंगा और ये बच्चा भी तुमसे छिन लुंगा, अशी धमकी दिल्याचं रश्मीनं वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा देखील रश्मीने केला आहे. किचनमधील टोकदार वस्तूने मारहाण करण्यात आल्याचं रश्मीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यावेळी आसिफचा मित्र मुनिबनं देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा आरोप रश्मीनं केला आहे.

वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रश्मीनं आपल्या मुलाबाबत विचारणा केली असता मुलाला देखील भेटण्यास मज्जाव केल्याचं रश्मीने सांगितलं. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात आसिफ शाबाजकर आणि त्याचा मित्र मुनिब विरोधात भा. दं. वि. ३५४ (विनयभंग), ५०९ (अश्लील शिवीगाळ), ३२४ (मारहाण), ५०६ (जिवे मारण्याची धमकी) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या