मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस मार्गावरील शितल तलावात शुक्रवारी दुपारी 19 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख आदित्य तायडे अशी झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली. तरुण तलावात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, कुर्ला पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोध घेतला. मात्र, तरुणाचा शोध लागला नाही. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ला पाचारण करण्यात आले. NDRF च्या जवानांनी व्यापक शोधमोहीम राबवत आदित्यचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.
यानंतर त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी कुर्ला पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा मृत्यू अपघाती बुडाल्यामुळे झाला, आत्महत्या आहे की अन्य कोणताही संशयास्पद प्रकार, याचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा