मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांने केली आत्महत्या

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंग परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.  अभिषय बाबू असे या तरुणाचे नाव असून तो विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम पाहतो.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पी ४ येथे अभिषय हा इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी अभिषयने पार्किंग परिसरातल्या पी ४(चौथा मजला) येथून उडी टाकून आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. अभिषयला जवळील शासकिय रुग्णालयात दाखल केले. अभिषयने आत्महत्या का केली. हे अद्याप स्पष्ठ झाले नसून या प्रकरणी सहार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केलेली आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या