क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

मुंबईत मॅच कुठलीही असो सट्टा हा खेळलाच जात असल्याचं अनेक कारवायांमधून स्पष्ट झालं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच श्रीलंका आणि इंग्लंड या क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक केली आहे. अंकित कोठारी (२८) आणि हेमंत जैन (४२) अशी या दोघांची नावं आहेत. लोटर या संकेतस्थळावरून हे दोघे सट्टा लावत असल्याचं पोलिस तपासात पुढे आलं आहे.

१७ मोबाईल हस्तगत

टिळक नगरच्या शिवम वास्तू इमारतीत काही जण श्रीलंका आणि इंग्लंडच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या फ्लॅटवर कारवाई केली. त्यावेळी अंकित कोठारी (२८) आणि हेमंत जैन (४२) या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

यातील अंकित कोठारी हा घाटकोपर, तर जैन हा गोवंडी येथील रहिवासी आहे. या दोन्ही आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांच्याजवळून काही रोख रकमेसह १७ मोबाईल, एक लॅपटॉप हस्तगत केला आहे.

पोलिसांकडू तपास सुरू

लोटस नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळाच्यामार्फत हा सट्टा घेतला जात होता. दरम्यान, आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या पाच मोबाईलमधील सीमकार्ड सोडल्यास इतर सीमकार्ड दुसऱ्या व्यक्तींच्या नावावर आहेत. याबाबत सध्या पोलिसांकडू तपास सुरू आहे. याशिवाय आरोपींकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप तपासणीसाठी न्यायावैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.


हेही वाचा - 

पाकिस्तान वि. अफगाणिस्तान मॅचवर बेटिंग प्रकरणी एकाला अटक

आयपीएल बेटिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

पुढील बातमी
इतर बातम्या