नरेंद्र डाभोळकर हत्याकांडात मोठा ट्विस्ट

बॉम्बे हायकोर्ट (Bombay High Court)ने महत्त्वाचा निर्णय देत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्याकांडातील दोषी शरद कळसकर याला जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी न्यायालयाने त्याची जन्मठेपेची शिक्षा अपील प्रलंबित असताना स्थगित केली आहे.

2013 मध्ये पुण्यात सकाळच्या वेळेत डाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 2024 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सहआरोपी सचिन अंदुरे (Sachin Andure) यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने तपास आणि पुराव्यांवर गंभीर शंका व्यक्त केल्या

  • प्रत्यक्षदर्शी साक्षींमध्ये विसंगती

  • आरोपीची ओळख पटवण्याची प्रक्रिया संशयास्पद

  • ओळख परेड योग्य पद्धतीने न झाल्याची नोंद

यामुळेच न्यायालयाने म्हटलं की, प्राथमिकदृष्ट्या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि अंतिम निर्णय येईपर्यंत आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो.

सरकारने जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती, मात्र बॉम्बे हायकोर्टने (Bombay High Court) ती मागणी नाकारली.

शरद कळसकर आता अपीलवरील अंतिम निकाल येईपर्यंत जामिनावरच राहणार आहे. या निर्णयामुळे डाभोलकर हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


हेही वाचा

DigiLocker वर पदवी प्रमाणपत्र उपलब्ध होणार

पुढील बातमी
इतर बातम्या