कोकेन विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक

मुंबई पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आज आणखी दोन परदेशी कोकेन तस्कर गळाला लागले आहेत. या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ३५ हजार रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे.

मुलुंडमध्ये जेरबंद

मुलुंडच्या नवघर परिसरातील सिमेन्ट यार्ड परिसरात दोन परदेशी नागरिक अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ओला कॅबने ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पोलिसांनी १२.५ ग्रॅमचे कोकेन हस्तगत केले.

साथीदारांच्या मागावर पोलिस

या आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराला पोलिसांनी नवी मुंबईतील कौपर खैरणे येथून अटक केली. त्याच्याजवळ १५.५ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले आहे. दोन्ही आरोपींकडून तब्बल २८ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. दोन्ही विदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, त्यांना अटक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ड्रग्ज कुठून आले याबाबत पोलिस तपास करीत असून, मुंबईसह परिसरात त्यांचे इतर साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या