New Year: नववर्षाच्या रात्री 'इतक्या' मद्यपी चालकांवर कारवाई

दरवर्षी थर्टीफर्स्टच्या दिवशी व नववर्षाच्या रात्री अनेक दुचाकीस्वार मद्यापानकरून वाहन चालवतात. पोलिसांच्या सुचनांकडं दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यंदाही नववर्षाच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार यंदा मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

७९८ चालकांना अटक

३१ डिसेंबरच्या रात्रीत हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी ७९८ चालकांना अटक केली असून विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या २९०४ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं नवीन वर्षाचं स्वागत करताना मुंबईकरांनी पोलिसांच्या सूचनांकडं दुर्लक्ष केल्याचं यंदाही दिसून आलं.

चालकांवर नजर

मुंबईत ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी सुरू केली होती. नाकाबंदी, गस्त याचबरोबर वेगमर्यादा तपासण्यासाठी बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यातूनही चालकांवर नजर ठेवण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत ७९८ मद्यपी चालकांना अटक केली असून यामध्ये ५८८ दुचाकीस्वारांचा तर २१० चारचाकी चालकांचा समावेश आहे.

४५५ मद्यपी चालक

मागील वर्षी २०१८मध्ये थर्टी फार्स्टला ४५५ मद्यपी चालकांना अटक करण्यात आली होती. दारुड्या चालकांबरोबरच बेदरकारपणं गाडी चालवणं, वेगमर्यादा ओलांडणं, विनाहॅल्मेट, सिटबेल्ट नाही तसेच, वाहतुकीच्या अन्य नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरही यावेळी कारवाई करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या