विविध कंपन्यांच्या स्किमद्वारे फसवणूक झालेल्यांना दिलासा

विविध कंपन्यांकडून स्किमद्वारे तसेच इतर कारणावरून फसवणूक झालेल्या नागरिकांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखने सदर कंपनीची जप्त केलेली मालमत्ता विकून आलेले पैसे रिफंड म्हणून देण्याची तयारी सुरू केली आहे. अशा प्रकारे प्रथम 40 कोटी रुपये परत करण्यात येणार असून, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने रिफंड पथकाची स्थापना केली आहे.

यापूर्वी सत्र न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला 9 तक्रारींमध्ये फसवणूक झालेल्या 35 हजार नागरिकांना पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने तयारी केली आहे. यावेळी ईओडब्लूने मेडिकेअर, काॅसमाॅस पब्लिसीटी, कोकणपार्क, सीयु मार्केटींग, सिमटिक फाईनांन्स, एडवेंचर ग्रुप, वीजेएस ग्रुप, पार्ले फाईनान्स, शिवानंद फाईनान्स या कंपनीकडून फसवणूक झाली आहे. या सर्व कंपनींची जवळपास 410 कोटीहून अधिक मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे.

यामुळे ही मालमत्ता विकून याचा परतावा या नागरिकांना देण्यात येणार आहे. ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरीकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे ईओडब्ल्यू सध्या न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या