अजानसाठी लाऊडस्पीकर वापरल्यानं मुंबईतील २ मशिदींविरोधात गुन्हा दाखल

ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि ध्वनी प्रदूषण नियमांबद्दल जागरूकता निर्माण केली. तसंच उल्लंघन करणाऱ्यांना चेतावणी दिली होती.

आता गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

सकाळच्या नमाजासाठी लाऊडस्पीकरचा वापर करून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पश्चिम उपनगरातील दोन मशिदींच्या पदाधिकाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

वांद्रे येथील बाजार रोडवरील नूरानी मशीद आणि सांताक्रूझ येथील मुस्लिम कबरस्तान मशिदीच्या इमामांवर (मुख्य पुजारी) गुन्हा दाखल करण्यात आला.

ध्वनी प्रदूषण नियम (2000) चे उल्लंघन केल्याबद्दल, सकाळी 6 वाजण्यापूर्वी लाऊडस्पीकर वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

मुंबईतील अंदाजे 1,140 मशिदींपैकी 90 टक्क्यांहून अधिक मशिदींनी त्यांचे लाऊडस्पीकर काढून टाकले आहेत किंवा म्यूट केले आहेत.  राञी १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर वापरता येणार नाही.

पोलिसांनी शाह यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या काही संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला.

दुसरा गुन्हा सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आहे. पश्चिम, लिंकिंग रोडवरील मुस्लिम मशिदीचे अध्यक्ष मोहम्मद शोएब अब्दुल सत्तार शेख आणि मशिदीचे इमाम आरिफ मोहम्मद सिद्दीकी यांच्याविरुद्ध नोंद करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सांताक्रूझ मशिदीने अजान वाचण्यासाठी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेतली होती आणि रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर वापरणार नाहीत या अटीवर त्यांना मान्यता मिळाली होती.

मात्र, शुक्रवारी पहाटे 5.35 वाजता लाऊडस्पीकरचा वापर करण्यात आल्याने पोलीस हवालदार घटनास्थळी पोहोचले.

सकाळी 6 वाजण्यापूर्वी अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर केल्याची पुष्टी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या