नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, मध्यरात्रीपर्यंत थांबवल्याने नागरिकांमध्ये नाराजी

ऐकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. पोलिसांकडून आवाहन करूनही नागरिक ही मोठ्या संख्याने बाहेर पडत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी वरळी सीफेसजवळ कारवाई करताना पोलिसांनी नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत थांबवून ठेवले. त्या ठिकाणी पोलिसांनी ५० ते ६० गाड्यांना थांबवून ठेवल्यामुळे काही वेळेसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. संचारबंदी असताना ही अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन मुंबई फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढण्यास मदत होत असल्याने पोलिसांनी अशा नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. घरापासून २ किलोमीटरच्या पुढे गेल्यास पोलिस नाकाबंदीत वाहने जप्त  करत आहेत. रविवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल ७ हजार ७५ वाहनांवर कारवाई केली. वरळी सीफेसजवळ रविवारी रात्री पोलिसांनी नाकाबंदीत ५० ते ६० गाड्यांना थांबवल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी चालकांचा परवाना काढून घेत त्यांना बाजूला थांबण्यास सांगितले. त्या ठिकाणी गाडीत ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलेही होती. कारवाई करताना पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना थांबवून ठेवल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. नियमांचे उल्लघंन झाल्याचे नागरिक मान्य करत होते. मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना थांबवून ठेवल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.

या कठीण काळात सर्व नागरिकांना, कायद्याच व सुव्यवस्थेेेेचा पालन करण्याचे आवाहन 'मुंबई लाइव्ह' कडून आम्ही आपल्याला करत आहोत. सध्याची परिस्थिती पाहता  लॉकडाउनचे पालन करणे गरजेचेे आहे. नागरिकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, हे नियम नागरिकांच्या काळजीपोटी राज्य सरकारने लादले आहेत. कोरोनव्हायरसविरूद्धच्या या लढाईत कायद्याचे समर्थन करणे आणि सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. आपले भविष्य अधिक चांगले करण्यासाठी महानगरपालिका, राज्य सरकार आणि पोलिस अधिक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आवश्यकते शिवाय घराबाहेर पडू नये.

माझे ८४ वर्षीय वडिल आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आम्ही चर्नीरोड येथे गेलो होतो. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. मात्र कुणीही आम्हचे ऐकून घेत नव्हते. आम्ही आमची चूक कबूल केली. तसेच पोलिसांना कारवाईसाठी ही सहकार्य करत होतो. माझा सोबत लहान मुलं, महिला असल्याने आम्ही त्यांना जी काही कारवाई आहे ती करा किंवा गाडी जप्त करत असाल, तर तशी आम्हाला पावती देऊन सोडण्याची विनंती करत होतो. मात्र एक पोलिस कर्मचारी आम्हच्याशी गैरवर्तन करत बोलत होता. रात्री १० ते मध्यरात्री २ पर्यंत आम्हाला पोलिसांनी थांबवून ठेवले होते.

निलेश गड्डा, विलेपार्ले

 

माझ्या वडिलांना ह्रदयाचा त्रास होत असल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालय दाखल केले होते. त्यांच्या देखभालीसाठी मी काही दिवस त्यांच्याजवळ ब्रिचकॅन्डी येथील घरी थांबली होती. आम्हच्याशिवाय त्यांचे दुसरे कुणी नाही. मला घेण्यासाठी माझे पती आले होते. मात्र घरी मुलुंडला परतताना वरळी सीफेसजवळ आम्हाला नाकाबंदीत पोलिसांनी अडवले. आम्ही त्यांना वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही आम्हचे ऐकून घेण्यास तयार नव्हते.

सुविधा पिल्ले, मुलुंड

माझा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात माझा पायावर पाच शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मी वडिलांच्या घरून मी माझ्या वरळी येथील घरी जात होतो. त्यावेळी आम्हाला नाकाबंदीत पोलिसांनी थांबवले. मी त्यांना वस्तूस्थिती दाखवली माझा पाय फॅक्चर असल्याचे ही दाखवले. मात्र एक पोलिस काँन्स्टेबल उलट आमच्याशीच चुकीच्या पद्धतीने  वागू लागला. परब असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असल्याचंं कळते. त्यांच्या खांद्याला त्यांची नेमप्लेट ही नव्हती. विशेषता तिथे अनेक गाड्यांची चौकशी न करता त्यांना सोडले जात होते. मात्र आम्ही त्यांना मेडिकल इमरजन्सीची कागदपत्र दाखवून ही आम्हाला रात्री उशिरपर्यंत थांबवून ठेवले होते. आम्ही मान्य करतो आम्हच्याकडून चूक झाली. पोलिसांना आम्ही कारवाईसाठी सहकार्य ही करत होतो. मात्र तरी आम्हाला मध्यरात्री २ पर्यंत थांबवून ठेवले होते.

निशांत सबनीस, प्रभादेवी

रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. मेडिकल इमरजन्सी असेल तरच नागरिकांनी त्यांच्या घराजवळी २ किलोमीटर आतील रुग्णालय अथवा मेडिकलमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश जरी मिळाले असले. तरी धोका अजून टळलेला नाही. ही बाब नागरिकांनी ही विसरून चालणार नाही. राज्य सरकारने नागरिकांना अत्यावश्य गोष्टींसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या दिल्या आहेत. तसेच त्यासाठी काही नियम ही घालून दिलेले आहे. या नियमाचे पालन करणे नागरिकांनी गरजेचे आहे.

प्रणय अशोक

पोलीस उपायुक्त  (ऑपरेशन्स) 

पुढील बातमी
इतर बातम्या