इसीसच्या मुंब्रा येथील हस्तकाला याआधी सौदीमध्ये अटक

इसीससच्या बिजनोर कनेक्शनाचा पर्दाफाश केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींबाबत धक्कादायक खुलासे उघडकीस येत आहेत. इसीसच्या भर्तीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या नाजीमला यापूर्वी सौदी अरेबियात देखील अटक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियाच्या दमाम प्रांतात तो तब्बल साडे तीन वर्ष काम करत होता. तिथे त्याला अटक करून 18 दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्याला भारतात परत पाठवण्यात आलं होतं. नेमका याच ठिकाणी तो इसीसच्या संपर्कात आल्याचा एटीएसला संशय आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने आणि स्थानिक यंत्रणांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ठाण्यातील मुंब्रा येथून उमर उर्फ नाजीम शमशाद आणि गुलफाम अंसारी यांना अटक केली होती. तर इतर दोघांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अटक केले असता, यातील नाजीम हा इसीसच्या बिजनौर कनेक्शनचा प्रमुख असल्याचे समोर आले होतं. नाजीमवर इसीससाठी तरुणांची भर्ती करणं, तसेच धर्माच्या नावाखाली फंड गोळा करण्याची जबाबादरी होती. त्यासाठीच तो बिजनौर सोडून मुंब्रा येथे आला असल्याची माहिती एटीएस ने दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या