मित्रच ठरला यमदूत

मालाड - मालवणी परिसरातल्या महाकाली येथे शुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वीरू बंसल असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही हत्या त्याचाच मित्र व्यंकटेश हरिजन याने केल्याचा आरोप वीरू बंसलच्या भावाने केलाय. मालवणी पोलिसांनी व्यंकटेशला अटक केलीय. सोमवारी त्याला बोरिवली कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


"रविवारी रात्री मोबाईलचे रिचार्ज करण्यासाठी वीरूने नकार दिला. त्यावरून वीरू आणि व्यंकटेशमध्ये वाद झाला. रागाच्या भरात व्यंकटेशने वीरूला चाकू मारला. जखमी वीरूला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला," अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फंटागरे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या