नवी मुंबईत एफडीएकडून APMCमधून कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा जप्त

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथील फळ व्यापाऱ्यांवर इथिलीन/इथेफॉनचा वापर करून कृत्रिमरित्या आंबा पिकवल्याबद्दल कारवाई केली. एफडीएच्या पथकाने एकूण 146 डझन आंबे जप्त केले.

एका राजकीय पक्षाच्या तक्रारीनंतर, पाच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात छापा टाकला. याप्रकरणी सुनील धोंडिबा राणे, गुलाम फ्रूट एंटरप्रायझेस आणि ज्ञानेश्वर शिवराम गावडे यांच्या दुकानातून 75,500 रुपये किमतीचे 146 डझन आंबे जप्त केले.

अधिकाऱ्यांनी कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांचे नमुनेही गोळा करून विश्लेषणासाठी पाठवले. फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर मानवी आरोग्यावर हानिकारक परिणामांमुळे अन्न सुरक्षा आणि मानके नियामक प्राधिकरणाने बंदी घातली आहे.


हेही वाचा

जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष

दादरमध्ये पेव्हर ब्लॉकने ठेचून एकाची हत्या, एक जखमी

पुढील बातमी
इतर बातम्या