माहीम चौपाटीवर पोलिसांचं अत्याधुनिक 'मरीन हेडक्वार्टर'

देशांची आर्थिक राजधानी मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्र सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. समुद्र सुरक्षेबाबत वेळोवेळी पावलं उचलत सरकारकडून सुरक्षेबाबत विशेष प्रशिक्षण, अत्याधुनिक यंत्रणा देण्यास सुरूवात झाली.  त्याचबरोबर पोलिसांना समुद्र सुरक्षेसाठी हक्काच्या मरीन हेडक्वार्टरची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार माहिम चौपाटीवर या हेडक्वार्टरचं बांधकाम सुरू होतं. या हेडक्वार्टरचं काम आता अंतिम टप्यात असून लवकरच या हेडक्वार्टरमधून मुंबईला वेढलेल्या समुद्रावर लक्ष ठेवलं जाणार आहे.

मुंबईला ४० किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय. पण या सागरी किनाऱ्यांची सुरक्षा करण्याकरता फक्त २१ सागरी पोलीस ठाणे आहेत. त्यापैकी ५ मुंबई, ५ ठाणे ग्रामीण, ५ रायगड जिल्हा, ६ सिंधुदर्ग, ५रत्नागिरी जिल्ह्यात ही पोलिस ठाणी आहेत. तर ३६ कोस्टल चौक्या, २२ नौका आणि ७ स्पीड बोटी आहेत. पण एवढा जथ्था असला तरी त्यातील बहुतेक साधनं ही जुनी आणि नादुरुस्तच आहेत. तर सागरी पोलिस ठाणी ही देखील तितकीशी अत्याधुनिक नव्हती. त्यामुळेच मुंबईच्या सागरी सुरक्षेला अनुसरून राज्य सरकारने समुद्र सुरक्षेसाठी स्वतंत्र ‘मरीन हेडक्वार्टर’चा निर्णय घेतला होता. यासाठी माहिम येथील समुद्र चौपाटीवर मुंबई पोलिसांसाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. या मरीन हेडक्वार्टरचं बांधकाम आता अंतिम टप्यात आहे.

असं आहे मरीन हेडकाॅर्टर

माहिम चौपाटीवर उभारण्यात आलेल्या तीन मजली हेडक्वार्टरमध्ये मुंबई पोलिस झोनचे डीसीपी आणि (एसआयडी) राज्य गुप्तचर विभागाचे कार्यालय असणार आहे. मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येणारे अनेक अलर्ट हे राज्य गुप्तचर विभागाला येतात. त्या अनुषंगाने गुप्तचर विभाग पोर्ट झोनला सर्तक करेल. तसंच या हेडक्वार्टरमधून मुंबईतील सर्व कोळीबांधवांच्या ५००० बोटींवर जीपीआरएस यंत्रणा आणि सीसीटिव्हीद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. तसंच या हेडक्वार्टरला ५७ स्वतंत्र अत्याधुनिक  स्पीड बोटी राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र सागर रक्षक दल मदतीसाठी राहणार आहे. समुद्रातील काही संशयास्पद गोष्टींची माहिती कळवण्यासाठी १०९३ ही हेल्पलाइन सुरू करणार आहेत.  

सागरी सुरक्षा

समुद्र किनाऱ्याची लांबी (पूर्व व पश्चिम)- ४० किलोमीटर

सागरी पोलिस ठाण्यांची संख्या - १

समुद्र किनाऱ्याची हद्द असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या - २६

समुद्र किनाऱ्यावर असलेल्या लँडिंग पॉइंट्सची संख्या - ६१

दोन्ही किनाऱ्यांवरील लँडिंग पॉइंट्सवर तैनात असलेल्या पोलिसांची संख्या - ३००

(दिवस व रात्रपाळी एकत्रित), सागरी हद्दीतील सर्वाधिक भाग यलोगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो.

पोलिसांसाठी उपलब्ध शस्त्रसाठा

एसएलआर रायफल

कार्बाईन

पिस्तूल

एके-४७ आणि त्यासाठी लागणारी काडतुसे.

वॉकीटॉकी १७

सर्चलाइट सेट ९

बायनाक्युलर

२सीलेग बोटी

एॅम्फिबियस बोटी

१२ टनाच्या बोटींची संख्या -१४

यांच्यासह अद्ययावत शस्त्रसाठा पुरवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

पश्चिम किनारपट्टीवरील संवेदनशील ठिकाणे

राजभवन, वांद्रे-वरळी सागरी सेतू, मढ येथील वायुदलाचा बेस (आयएनएस हमला), तटरक्षक दलाचा बेस (आयएनएस त्राता), महालक्ष्मी, हाजीअली

पूर्व किनारपट्टीवरील संवेदनशील ठिकाणे

भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी), जेएनपीटी, आरसीएफ, ओएनजीसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल रिफायनरी, घारापुरी, गेट वे ऑफ इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट

सागरी पोलिसांच्या गस्तीचा आढावा

१२ सागरी पोलिस ठाण्यांची उभारणी

पोलिसांच्या गस्तीसाठी वापरण्यात येणा-या बोटींची संख्या – ४८

( केंद्राकडून मिळालेल्या- २८, राज्य सरकारने खरेदी केलेल्या बोटी- ११ , जुन्या बोटींची संख्या- ९

भाडेतत्त्वावरील मच्छीमार नौका -३

या बोटींवर आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले पोलिस तैनात आहेत.

पावसाळ्यात गस्त बंद असते


पुढील बातमी
इतर बातम्या