IPLवर दहशतवादाचे सावट नाही, पोलिस अतिरिक्त सुरक्षा पुरवणार

IPL 2022 मध्ये कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचं वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळून लावलं आहे. क्रिकेट स्पर्धेवर कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचं सावट नाही, असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोणालाही धमकावल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे.

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२२ (IPL 2022)ची उत्सुकता सर्वांनाच आहे. आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याच्या तर्चांना उधाण आलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून एक पत्रक (Mumbai Police) काढत स्पष्टीकरण दिलं आहे की, आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवादाचं सावाट नाहीये.

मुंबई पोलिसांनी आपल्या पत्रकात म्हटलं, आयपीएलचे क्रिकेट सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम इथल्या मैदानावर २६ मार्च २०२२ पासून सुरू होत आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी मैदानावर तसंच हॉटेल्सवर मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येत आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंटच ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपूट किंवा माहिती प्राप्त झालेली नाहीये.

दहशतवाद विरोधी पथकानं एकाला अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यानं वानखेडे स्टेडिअम (Wankhede stadium), नरिमन पॉईंटचे ट्रायडंट हॉटेल (Trident hotel, Nariman Point) तसंच खेळाडूंचा हॉटेल ते स्टेडिअमपर्यंतच्या मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली आहे. मात्र, आता पोलिसांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

आयपीएल स्पर्धेत यंदा ७० साखळी सामने होणार आहेत. २६ मार्च ते २२ मे या कालावधीमध्ये हे सर्व सामने महाराष्ट्रात होणार आहेत. या संपूर्ण कालावधीमध्ये खेळाडू तसंच आयपीएलच्या संबंधित सर्व व्यक्तींसाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

  


हेही वाचा

उल्हासनगर - २ कुत्र्यांना फाशी देऊन केले ठार

मुंबईत ५७० लिटर भेसळयुक्त दूध जप्त

पुढील बातमी
इतर बातम्या