कुख्यात स्मगलर चिंकू पठाण रुग्णालयात

NCB च्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्ट्रीवर कारवाई करत, डी गॅगचे कंबरड मोडलं आहे. या कारवाईत पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची रोकड आणि ड्रग्ज हस्तगत करत डी गँग मधील मोठ्या तस्करांना अटक केली. त्याच गुन्ह्यातील कुख्यात तस्कर चिंकू पठाण याची तब्येत खालावल्याने त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या चिंकू हा ATS च्या कस्टडीत होता.

NCB चे अधिकारी समीर वानखडे हे सध्या डी गॅगसाठी कर्दनकाळ ठरत आहे. काही दिवसांपूर्वी वानखडे यांच्या नेतृत्वा खाली NCB ने डोंगरी परिसरात सुरू असलेल्या ड्रग्ज फॅक्टीवर कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान NCB ने २ कोटी १८ लाखांची रोकड आणि १२ किलो ड्रग्जसह शस्त्रही हस्तगत केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणसह तिघांना अटक केली होती. आरोपींच्या चौकशीत आणि त्यांच्याजवळ मिळालेल्या डायरीतून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने मागील ५ वर्षात तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकून हजारो कोटी रुपये हवाला मार्फत ‘डी गँग’ला पाठवल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर चिंकू पठान यांच्याजवळ आढळलेल्या डायरीत पोलिसांना दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम आणि फहिम मचमच यांच्याही नावाचा उल्लेख आढळून आली होती. त्यामुळे NCB नंतर चिंकूचा ताबा हा महाराष्ट्र ATS च्या अधिकाऱ्यांनी घेतला.

ATS च्या चौकशीत असताना अचानक चिंकूला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ATS च्या अधिकाऱ्यांनी त्याला जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डाँक्टरांनी त्याला अँडमिट करून घेतले. सध्या पोलिस बंदोबस्तात चिंकू पठाण रुग्णालयात आहे. त्याच बरोबर NCB ने ड्रग्स तस्करीतून दाऊद आणि त्याच्या हस्तकांनी कमावलेली संपत्ती ही जप्त केली जाणार आहे. त्याच बरोबर या सर्व गुन्ह्यांसंदर्भाची माहिती ईडी आणि एनआयएला देखील देणार आहे. काही दिवसात मुंबईतून दाऊदची दहशत संपवणार आणि ड्रग्ज तस्करीला कायमचा ब्रेक लावण्याचा दावा NCB चे अधिकारी समीर वानखडे यांनी केला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या