पालघर जिल्ह्यात सध्या अल्पवयीन मूलं आणि मुलींच्या अपहरणाच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात 22 ते 25 एप्रिल या चार दिवसांत 6 मुली आणि एका मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे यात 10 ते 17 वर्षांखालील मुलांचा समावेश असल्याची अधिक माहिती मिळत आहे. नालासोपारा पूर्व येथे 17 वर्षीय एका अल्पवयीन मुलीचं अपहरण 22 एप्रिलला संध्याकाळी 4.30 च्या सुमारास झालं. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला आहे.