९६ हजारांच्या बनावट नोटांसह एकाला अटक

दोन हजार रुपये किंमतीच्या ९६ हजारांच्या बनावट नोटांसह (राष्ट्रीय तपास यंत्रणा) एनआयएने दोघांना नुकतीच अटक केली आहे. सद्दाम हवालदार आणि फहाद चांदीवाला अशी या दोघांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सापळा रचून कारवाई

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात दोघेजण बनावट नोटांची तस्करी करण्यासाठी येत असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनआयएचे अधिकारी अंधेरी एमआयडीसी परिसरात सापळा रचून बसले होते. दरम्यान हवालदार आणि चांदीवाला हे संशयितरित्या त्या भागातून बॅग घेऊन फिरत होते. 

एनआयच्या अधिकाऱ्यांना त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांजवळ २ हजार रुपयांच्या ४८ नोटा आढळून आल्या. याप्रकरणी एनआयएने एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या