कथ्थक शिक्षकावर फसवणुकीचा गुन्हा

मरिन ड्राइव्ह - व्यावसायिकाची 1 कोटी 70 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कथ्थक शिक्षकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप महावीर असे या कथ्थक सम्राटाचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मारिन ड्राइव्ह पोलिसांनी सांगितले.

एका कार्यक्रमादरम्यान त्याची व्यावसायिक मनीष शहा यांच्याशी ओळख झाली. या वेळी व्यावसायिकाने संदीप महावीर यांना घरी येऊन आपल्या पत्नीस कथ्थक शिकवण्याची विनंती केली. महावीर यांनी शहाच्या पत्नीला शिकवण्यास सुरुवात देखील केली. दरम्यान महावीर यांनी शहांना नृत्याच्या कार्यक्रमात पैसे गुंतवण्यास सांगितले आणि मोठा परतावा मिळेल असे आश्वासन देखील दिले. त्यानुसार शहांनी तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये गुंतवले. मात्र त्यांना परतावा काही मिळाला नाही. त्यांनी महावीरकडे परताव्याचा तगादा लावला. मात्र महावीर यांचा सूर बदलला आणि पैसे देणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर व्यावसायिक शहा यांनी मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

पुढील बातमी
इतर बातम्या