दहिसर पेपरफुटी प्रकरण, 'विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही'

 दहिसर येथील इस्त्रा शाळेत मुख्यधपकांच्या कार्यालयातूनएसएससी बोर्डाच्या 516 उत्तर पत्रिका मंगळवारी चोरीला गेल्या होत्या. यामुळे आता त्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय, असं वाटत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. 

विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे गुण दिले जातील. बोर्डाच्या नियमानुसार आणि योग्य पद्धतीनेच विद्यार्थ्यांना गुण दिले जातील अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करू. पोलिसांच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल असंही जगताप म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या