कोरेक्सचे दलाल जेरबंद

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

आग्रीपाडा - डॉक्टरांच्या संमतीशिवाय तरुणांना कोरेक्स सिरप विकून त्यांना नशेच्या दरीत ढकलणाऱ्या कोरेक्सच्या दलालाला आग्रीपाडा पोलिसांनी एफडीएच्या मदतीने अटक केली आहे. अब्दुल फैजल रेहमान अन्सारी (२५) असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून ५० कोरेक्सच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आग्रीपाडा परिसरात कोरेक्स पिऊन नशा करणा-यांची संख्या वाढली होती, त्यामुळे गुन्हेगारी देखील वाढत होती. पोलिसांनी तपास केला असता या पाठी हा अब्दुल फैजल रेहमान शेख असल्याचा उलगडा केला.

कोरेक्स हे खर तर औषध आहे मात्र डॉक्टरच्या चिट्ठीशिवाय विकता येत नाही. अब्दुल कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय ते विकत असे. एका वेळी केवळ दोन ते तीन चमचे हे सिरप पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र नशेखोर एका वेळी संपूर्ण बाटली पितात त्यामुळे त्यांना नशा चढतो असं एफडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अब्दुलची चौकशी केली असता तो हे सिरप कुर्ला येथील असद अश्रफ अलख इहमदकडून विकत घेतल्याचं समोर आलं आहे. त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या