फिजियोथेरेपीस्टच्या हत्येचा उलगडा

विलेपार्ले - फिजियोथेरेपीस्टच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेल्या देबाशिष धाराने हत्या केल्याचं मान्य केलं आहे. विलेपार्ले परिसरात राहाणाऱ्या महिला फिजियोथेरेपीस्टची पाच डिसेंबरच्या रात्री हत्या झाली होती. हत्येनंतर त्या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालामध्ये समोर आलं होतं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएनए चाचणीनंतर देबाशिषचा हाच आरोपी असल्याचं सिद्ध झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कसा झाला उलगडा?

हत्येच्याच रात्री सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. पण आरोपी कोण? याचा उलगडा काही होत नव्हता. पण प्रसारमाध्यमांवर हे सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर देबाशिष 10 जानेवारीला पश्चिम बंगालला पळाला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्याच्यावरील संशय बळावला आणि तात्काळ विलेपार्ले पोलिसांचं पथक पश्चिम बंगालच्या दिशेने रवाना झाले.

हत्येचा हेतू

या हत्येची कबुली जरी देबाशिषने दिली असली तरी हत्येच्या हेतूविषयी पोलीस माहिती देण्यास तयार नाही. एकतर्फी प्रेमाने ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. तर दुसरीकडे या महिला फिजियोथेरेपीस्टचे अनेक मित्र होते. तिला भेटण्यासाठी वारंवार तिच्या घरी येत असत त्याचा देखील या देबाशिषला राग असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या