Yes Bank चे माजी एमडी राणा कपूर यांना अटक

मनीलाँड्रिंग प्रकरणी बुधवारी ईडीने येस बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ राणा कपूर यांना अटक केली. हे प्रकरण महाराष्ट्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक  घोटाळाप्रकरणाशी निगडीत आहे. बुधवारी विशेष पीएमएलए कोर्टाने कपूरला ३० जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. पीएमसी घोटाळा, रिअल इस्टेट डेव्हलपर एचडीआयएलला येस बँकेचं कर्ज, अंधेरीतील नवीन बांधकाम केलेल्या इमारतीचं रिनोव्हेशन इ. याबाबत ईडीला कपूर यांची चौकशी करायची आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार आमदार हितेंद्र ठाकूर  यांच्या विवा ग्रुपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असणाऱ्या चौकशीमध्ये राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी ताब्यात घेतले. विवा ग्रुपमधील काही कार्यालयांवर ईडीने गेल्याच आठवड्यात छापेमारी केली होती.६३ वर्षीय राणा कपूर यांना ईडीने गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. त्यानंतर कपूर न्यायालयीन कोठडीत आहेत. कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात डीएचएफएलशी संबंधित कंपनीकडून ६०० कोटी रुपये घेतल्याबद्दल केंद्रीय एजन्सी तपास करीत आहे. आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ६३ वर्षीय राणा कपूर यांना ईडीने गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. त्यानंतर कपूर न्यायालयीन कोठडीत आहेत. कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात डीएचएफएलशी संबंधित कंपनीकडून ६०० कोटी रुपये घेतल्याबद्दल केंद्रीय एजन्सी तपास करीत आहे. आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या