२० लाखाच्या इफिड्रिन साठ्यासह एकाला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

एमडी ड्रग्जला पर्याय म्हणून आता तस्करांनी इफिड्रिन या अंमली पदार्थाची तस्करी कोल्ड्रिंकमधून करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच या इफिड्रिन ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी अंबोली पोलिसांनी मोहम्मद नदीन शरीफ खान याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून २० लाखांचं इफिड्रिन ड्रग्ज हस्तगत केलं आहे.

या ड्रग्जची मागणी वाढली

विविध हॉटेल आणि पबमध्ये इफिड्रिन हे नशेसाठी छुप्या पद्धतीनं वापरलं जातं. अनेकदा बर्फावर या इफिड्रिनची पावडर टाकली जाते, किंवा कोल्ड्रिंकमध्येही मिसळून याची तस्करी केली जाते. या इफिड्रिन ड्रग्जला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

सापळा रचून एकाला अटक

गुजरात राज्यात या ड्रग्जची तस्करी सर्वाधिक होत असल्याची माहिती पुढे आली आहे. नुकतीच या ड्रग्जच्या तस्करीसाठी एक जण अंबोली परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दया नाईक यांना मिळाली होती. त्यानुसार अंबोली पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद नदीन शरीफ खान याला अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी २० लाखाचं ड्रग्ज हस्तगत केलं आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या