लोकलच्या गर्दीत मोबाइल चोरणारे अटकेत

गणेशोत्सवाच्या गर्दीत लोकलमध्ये चोरी करणाऱ्या दोघा सराईत आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हरीषकुमार अमरसिंग आणि सोनू शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी गणेशोत्सवात चोरलेले २० मोबाइल जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांनी दिली.

अशी कारायचे चोरी

मुंबईच्या लालबाग-परळ परिसरात गणेशोत्सवात लाखोभाविक दर्शनासाठी येत असतात. त्यावेळी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही चोर चोरी करण्याच्या उद्देशाने दिल्लीतून आले होेते. दादर ते चिचंपोकळी दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना लक्ष करून त्यांचे महागडे मोबाइल हे दोघे चोरायचे.

याबाबत पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चिंचपोकळी रेल्वे स्थानकात नजर ठेवून होते. त्यावेळी लोकलमध्ये चढत असताना प्रवासी ज्ञानेश्वर जगताप यांच्या खिशातील 17 हजाराचा मोबाईल काढून पलायन करणाऱ्या दिल्लीतील हरीषकुमार अमरसिंग या चोराला लोहमार्ग पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.

साथीदारांनाही अटक

चौकशीतून त्याचे चार साथीदारही या चोरीत सामील असल्याचं त्याने सांगितलं. ते मुंबईतील दोनटाकी परिसरातील हॉटेलमध्ये लपल्याची माहितीही त्याने दिली. पोलिसांनी सापळा लावून हॉटेलमध्ये छापा टाकला असता सोनू शर्मा या त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी त्यांच्या खोलीची झडती घेतली असता 4 लाख 75 हजार किंमतीचे चोरलेले मोबाईल सापडले. पोलिसांनी एकूण 21 मोबाईल जप्त केले असून त्यांची किंमत 4 लाख 92 हजार आहे. पोलिस त्याच्या इतर दोन साथीदांराचा शोध घेत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या