नोटबंदीनंतर नकली नोटांचा पहिला गुन्हा दाखल

पायधुनी - भारतीय चलनातून 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्यानंतर अखेर 10 दिवस उलटून गेल्यावर नकली नोटा बँकेत जमा केल्याचा पहिला गुन्हा मुंबई पोलिसांकडे दाखल झाला आहे. ९३ हजारांच्या नकली नोटा जमा केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी शिवाजी तुकाराम पवार (३५) याला ताब्यात घेतलं आहे. पायधुनीतल्या पी. डिमेलो रोडवर पंजाब-महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक आहे. या बँकेत शुक्रवारी दुपारी एक व्यक्तीने १ हजार रुपयांच्या ९३ नोटा जमा केल्या, घाई-गडबडीत कॅशिअर सुखविंदर जसविंदर कमेस्ट्रा यांनी नोटा पडताळून पाहिल्या नाहीत. नंतर मात्र रक्कम मोजताना १ हजाराच्या ९३ नोटा नकली असल्याचं लक्षात आलं. बॅंकेतील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता, हे पैसे शिवाजी पवार या व्यक्तीने भरल्याचं समोर आलं. त्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या खोट्या नोटा शिवाजी पवार यांच्याकडे आल्या कुठून याचा तपास सध्या पोलीस करतायत.

पुढील बातमी
इतर बातम्या