विनाकारण नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांची संख्या 1838 वर

राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक नागरिक याला हरताळ पाळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच आहे. कोरोना व्हायरसची मुंबईत 330 जणांना आत्तापर्यंत लागण झाल्याचं समोर आले. मात्र अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नाही. मुंबईत संचार बंदीचे उल्लघंन करणाऱ्या अशा 1838 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत. 

देशात कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नव नवे रुग्ण मुंबईच्या काना कोपऱ्यातून पुढे येत असताना. नागरिकांना मात्र त्याचे कोणतेगी गांभीर्य राहिलेले नाही. या ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत असून अनेक ठिकाणी पोलिसांवरच नागरिकांनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे.  मात्र अशा बेशिस्त नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आतापर्यंत 1838 गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे. त्यातील 1443  जणांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे. तर 287  जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. तर 117जणांचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

नियम पायदली तुडवणाऱ्यांमध्ये दुकानदार आणि विक्रेत्यांची ही कमी नाही.  उत्तर मुंबईत्शा विक्रेते आणि दुकानदारांची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर मुंबईत पोलिसांनी काल दिवसभरात 32 जणांवर गुन्हे नोंदवलेले आहे. त्या खालोखाल पूर्व मुंबईत गुन्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. पूर्व मुंबईत 31 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवलेले आहेत. त्याच बरोबर दक्षिण मुंबईत 32, मध्य मुंबईत 32, पश्चिम उपनगरात 1 गुन्हे पोलिसांनी विक्रेते आणि दुकानदारांवर नोंदवलेले आहेत.  ज्यामध्ये 1 हाॅटेलवाले, 2 पान टपरी, 3 किरकोळ दुकाने, 68 सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे,  13 अवैध्य वाहतूक, 1 फेरीवाल्यांचा ही समावेश आहे. मुंबईत आतापर्यंत या महामारीने 22 जणांचा बळी घेतलेला आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतले अनेक भाग सील करण्यात आलेत. एवढं सगळं होत असताना नागरिक मार्केटमध्ये गर्दी करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या