कुरारमध्ये छेडछाडीप्रकरणी तिघांना अटक

मालाड - कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 मुलींचं अपहरण आणि अन्य मुलींसोबत छेडछाड केल्याची तक्रार दाखल झालीय. पिंपरी पाडा येथे गुरुवारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. तर एक आरोपी फरार आहे. सलिफ्फोर्ड(28), महेंद्र कोटेकर (28), मनीष मिस्त्री(20) अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी या तिघांवर 354 आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी संध्याकाळी साडे 6 च्या दरम्यान मुलींनी तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती झोन 12 चे डीसीपी किरण चौहान यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या