वडाळा पोलिसांची भिकाऱ्यांवर कारवाई

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - मुंबईत मोठा घातपात घडवण्यासाठी दहशतवाद्यांनी रेल्वे रुळांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिकांचा वापर केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. भिकारी, गर्दुल्ल्यांचा वापर केला जात असावा असा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय. त्या अनुषंगाने वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वडाळा रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकावर भिक मागणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 18 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. यात 17 पुरूष आणि 1 महिलेचा समावेश होता. या 18 जणांना कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. 18 पैकी 14 जणांना सोडून दिले. तर 4 जणांना चेंबूरमध्ये बेघर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिलेत. या चौघांना बेघर होममध्ये ठेवण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या