भेंडीबाजारात सापडली 127 जिवंत काडतुसं

भेंडीबाजार - दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार परिसरात 127 जिवंत काडतुसं सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ही काडतुसं एका गटारात सापडली असून जे जे मार्ग पोलीस तसंच गुन्हे शाखेनंही या प्रकरणी तपास सुरू केलाय.

सापडलेली ही काडतुसं .32 (पॉईंट 32) एमएम बोअरची असून, ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. बुधवारी संध्याकाळी भेंडीबाजारातल्या मटणवाला स्ट्रीट येथे एका मटणविक्रेत्याला ही काडतुसं दिसली. तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं आणि ही काडतुसं ताब्यात घेण्यात आली. ही काडतुसं जिवंत असून, ती नेमकी कुणाची, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

भेंडीबाजारात डी कंपनीच्या म्हणजेच दाऊदच्या अनेक हस्तकांचं अजूनही वास्तव्य आहे, असं मानलं जातं. त्यामुळे या काडतुसांचं डी कंपनीशी काही कनेक्शन आहे का, याचाही तपास करण्यात येतोय. ही काडतुसं बरीच वर्षं जुनी असल्याची माहिती जे जे मार्ग पोलिसांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या